About us

About Us

ब्राह्मण समाजाच्या हितासाठी गेली काही वर्षे काम करीत असताना अनेक प्रकारचे अनुभव आले. ‘विवाह’ ही समस्या या समाजाला प्रचंड भेडसावत असल्याचे प्रामुख्याने लक्षात आले. हा प्रश्न कठीण तर बनला आहेच पण तो दिवसेंदिवस अधिकच जटील होत आहे. विषम जन्मदर हे त्याचे प्रमुख कारण असले तरी या प्रश्नाला अनेक कंगोरे आहेत. या प्रश्नातून मार्ग काढणे, हे या समाजातील सर्वच संवेदनशील, सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या, विधायक विचारांना वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांपुढील एक मोठे आव्हान आहे. हे आव्हान स्विकारावे व खारीचा वाटा उचलावा म्हणून केलेला हा एक प्रपंच !

ब्राह्मण समाजासाठी काम करीत असताना सध्याच्या काळात मनामध्ये कोणताही स्वार्थ न ठेवता त्याग व समर्पित वृत्तीने काम करीत असलेल्या तन, मन, धन खर्चून कार्य करीत असलेल्या व्यक्ती अभावानेच आढळून आल्या. एवढेच नव्हे तर अशा त्यागमय जीवन जगणाऱ्या समर्पित व्यक्तींवर पूर्ण विश्वास ठेऊन त्यांच्याविषयी आदर बाळगणाऱ्या व्यक्तीही अभावानेच सापडल्या. त्यासाठीच अशा सर्व समर्पित, त्यागमय कर्म करणाऱ्या व त्यांच्याविषयी मन:पूर्वक आदर बाळगणाऱ्या विभूतींच्या चरणी हा प्रयोग समर्पित !

रक्तदान, नेत्रदान, देहदान, अवयवदान, बहुभाषिक ब्राह्मणभेद व कोणत्याही प्रकारचे शाखाभेद न मानणाऱ्या, पचांगकर्ते मोहन दाते यांच्या म्हणण्याप्रमाणे जन्मपत्रिकेचा व्यावहारिक वापर करु पाहणाऱ्यांसाठी तसेच वेळप्रसंगी आंतरजातीय विवाहालाही प्रोत्साहन देणारा हा प्रयत्न !

भारताला संपूर्ण जगात एक सामर्थ्यशाली व महासत्ता तयार करण्याचे स्वप्न साकारताना प्राचीन काळातील थोर ऋषिमुनींनी दिलेला “सर्वेपि सुखीन: संतू”चा संदेश अंमलात आणण्यासाठी सुसंस्कारीत, समर्थ, सक्षम कुटुंब तयार करण्याचे आव्हान सर्व समाजासमोर उभे ठाकले आहे. सामर्थ्यशाली, देशभक्तीने भारलेली नवी पीढी तयार करण्यासाठीच ‘विवाह’ हा संस्कार सोहळा आहे. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात, असे म्हटले जाते, ते खरेही असेल, पण ‘दे रे हरी, खाटल्यावरी’ असेही होत नाही. उच्चतम यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्नवादाची कास धरावीच लागते. अशा प्रयत्नवादी लोकांसाठी हा प्रयत्न !

या प्रकल्पामागील प्रेरणा समाजासाठी तळमळीने व त्यागमय कार्य करणाऱ्या समाजबांधवांची आहे तर कल्पना व प्रयत्न अस्मादिकांचा आहे. INTERNET सारख्या आधुनिक तंत्रयुगाचा फायदा घेत हे SOFTWARE तयार करण्यात आले आहे. ADVANCED PROFESSIONAL ADMINISTRATION ची प्रमुख जबाबदारी मुख्य संचालिका या नात्याने सौ. अनिता कोरडे तर संपूर्ण TECHNICAL जबाबदारी श्री नरहर कोरडे पार पाडीत आहे. या प्रयत्नास आता आशीर्वाद, शुभेच्छा देण्याची जबाबदारी तूम्हा सर्वांची आहे….

कळावे, धन्यवाद.

– नरहर कोरडे, अहमदनगर.

मो. 94 2343 0004.