Privacy Policy

Privacy Policy

1. Brahmin Vadhu Var कडे नावनोंदणी करणाऱ्यांना उच्चतम दर्जाची अखंडतेसह सेवा देण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत. सत्य, प्रामाणिक, विश्वासार्हता व उच्चगुणवत्तापूर्ण सेवा हीच आमची बांधीलकी आहे.

2. आवश्यकता असेल तेथे व्यक्तीमत्व विकास, योग्य सादरीकरण व चांगल्या गुणांचे दर्शन किंवा प्रभाव वाढविण्याचा मानस आहे. स्वभावातील चांगल्या गुणवैशिष्ट्यांच्या दर्शनामुळे व प्रभावामुळे योग्य ते ईप्सीत साध्य होऊ शकते. स्वभावदोष दूर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. नोंदणीकर्त्याने केलेल्या सहकार्यावर हे अवलंबून आहे.

3. नोंदणीकर्त्याची सर्व माहिती सर्व जगाला करुन देऊन त्याचे प्रदर्शन मांडले जावे किंवा त्याला अक्षरश: बाजारात उभे केले जावे, ही आमची अजिबात ईच्छा नाही. तर संबंधितांपर्यंतच नोंदणीकर्त्याची आवश्यक ती सर्व सत्य माहिती जाऊन व त्याने त्या माहितीची सत्यता पडताळून, खातरजमा करावी, अशी अपेक्षा आहे. हे करीत असताना योग्य ती दक्षता घ्यावी.

4. नोंदणीकर्त्याची माहिती गुप्त ठेवणे याचा अर्थ ती काही ठराविक लोकांसाठी, ज्यांना व त्या नोंदणीकर्त्यालाही त्याची गरज आहे, त्यांनाच ती माहिती उपलब्ध होणे आवश्यक आहे. एवढाच याचा मर्यादित अर्थ आहे. अपेक्षा आहे. इतर कोणाचाही संबंध नसलेल्या व्यक्तीस / नोंदणीकर्त्यास तुमची माहिती का उपलब्ध व्हावी? ती होण्याची गरज नाही. अखेरीस “लग्न” हा विषय काही मर्यादित अर्थासाठी “खासगी” देखील आहे. हे समजून घेणे, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. यासंबंधी कोणाचीही कोणत्याही प्रकारची तक्रार चालणार नाही.

5. हे संकेतस्थळ कोणाचीही गुप्त किंवा खासगी माहिती, क्रेडीट / डेबीट कार्ड क्रमांक, BANK खाते क्रमांक, कोणताही PASSWORD यासारखी अर्थिक माहिती मागवित नाही, गोळा करीत नाही. ती देऊ नये.

6. या संकेतस्थळावर नोंदणीकर्त्याच्या / वापरकर्त्याच्या परवानगीने व संमतीने माहिती प्रसिध्द केली जाते. खासगी माहिती प्रसारित /
प्रकाशीत केली जात नाही. जी माहिती प्रसारित / प्रकाशीत होऊ नये, असे नोंदणीकर्त्यास वाटत असेल, तर त्याने अशी माहिती अजिबात देऊ नये.

7. या संकेतस्थळाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर पूर्णपणे अवलंबून राहून नोंदणीकर्त्यास संपर्क / संवाद साधण्याचा सल्ला देत नाही. प्रत्येकाला माहितीची खातरजमा करुन घ्यावी लागेल. ती पूर्णपणे त्याची जबाबदारी आहे. स्वत: जबाबदारी स्विकारुन जोखीम पत्करुन त्याने पुढील संवाद साधायचा आहे.

8. प्रत्येक नोंदणीकर्त्याचा नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र त्याच्या परवानगीनेच ही माहिती, ज्या दुसऱ्याने त्याची मागविली आहे, त्यास दिली जाते. संपर्क साधणे, यासाठी आवश्यक आहे. दुरध्वनी, मोबाईल अथवा FACEBOOK, WHATSAPP चा उपयोग केल्यास त्याची माहिती गुप्त ठेवण्याची जबाबदारी या संकेतस्थळावर नाही.

9. आपल्यापासून इतरांना व इतर कोणापासून आपल्याला किंवा कोणालाही त्रास होऊ नये, कोणतीही हानी किंवा नुकसान होऊ नये यासाठी सर्व ती आवश्यक दक्षता घेण्यात आली आहे. यासाठी आवश्यक ते सर्व शिष्टाचार व सभ्यपणाचे, सज्जनतेच्या प्राथमिक नियमांचे पालन केले पाहिजे. यासाठीच माहितीच्या गुप्ततेची दक्षता घेण्यात आली आहे. योग्य त्याच व्यक्तीच्या माहितीचा आपल्या पवित्र हेतूसाठी अचूक वापर होणे अपेक्षित आहे.

10. उपवधू किंवा उपवर यांनी स्वत:च्या FACEBOOK ACCOUNT, TWEETER ACCOUNT, WHATSAPP NUMBER दिल्यास उपयोग होऊ शकतो. त्याव्दारे नोंदणीकर्त्याची आवड, स्वभाव, संपादन केलेले अंगभूत कलागुण, विचार व वैचारिक क्षमता समजू शकते. या माहितीचा वापर योग्य त्याचवेळी, योग्य त्यांच्यासाठीच करणे, हे नोंदणीकर्त्याच्या हिताचे आहे.